मुंबई : काँग्रेसने ‘असंगाशी संग’ केला म्हणून काँग्रेसची भाषा बदलली आहे. आज आघाडी सरकार गैरकायदेशिर वीष पोलिसांच्या माध्यमातून व्यवस्थेत ओतण्याचे काम करत आहे. तसेच काँग्रेसचं टूल किट होणं हे देशासाठी धोक्याचं आहे, अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारवर केली आहे.
सुधीर मुनगंटीवार आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले, आघाडी सरकारच्या या राज्यामध्ये ज्या प्रकारे पोलिसांचा वापर होतोय. कायद्याचे उलंघन होतय. अर्णव गोस्वामी असेल नारायण राणे, किरीट सोमय्या, कंगना रणावत असतील यांच्याबाबतीत ही कायद्याचे उलंघन करण्यात आले. याप्रकरणांची मी काल यादी काढली आहे. महाराष्ट्रातील अनेक घटनांत आघाडी सरकारने कायद्याचे उल्लघंन केले आणि न्यायाधीशांनी न्याय देताना त्यांच्यांवर ताशोरे ओढले आहेत.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, हे गैरकायदेशिर विष पोलिसांच्या माध्यमातून व्यवस्थेमध्ये ओतण्याचे काम करत आहेत. हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक वैचारिक लढाईमध्ये आता आघाडीची ओढून मारा अशी भूमिका आहे. आज काँग्रेस मुद्द्यांवरुन गुद्यांवर गेली आहे. काँग्रेस ज्या पद्धतीने टूल किटचा भाग झाली आहे, हे या देशासाठी अतिशय हाणीकारक आहे.
आज काँग्रेस ज्याप्रमाणे टूलकीटचा भाग झालीये ते या देशासाठी खूप हानिकारक आहे..! @BJP4Maharashtra pic.twitter.com/qQYiIxXRjd
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 23, 2021
सुनील केदार यांच्या वक्तव्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, सुनील केदार हे माझे मित्र आहेत. त्यांची भाषा संगतीमुळे बिघडली आहे. असंगाशी संग केला तर अशा पद्धतीची भाषा येते. उद्या ते भाजपाशी संग करतील तेव्हा त्यांची भाषा बदलेल. चांगल्या संगतीत राहतील तर चांगली भाषा करतील. असेही मुनगंटीवार म्हणाले.
सुनील केदार म्हणाले होते, “निवडणुकीत काँग्रेसचा कितीही मोठा नेता बेईमानी करत असेल तर त्याला तिथंच गाडीतून उतरवा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसचं मी पाहून घेईन” या वक्तव्यावरुन मुनगंटीवार यांनी संगतीमुळे त्यांची भाषा बिघडल्याचे म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महंत नरेंद्र गिरींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं मृत्यूचं खरं कारण
- पुरावे असतील तर खुशाल तक्रार करा; अजित पवारांचं दरेकरांना सडेतोड उत्तर
- मोदी सरकार अडचणीत! पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
- ‘आतापर्यंत नाहक राज्य सरकारला बदनाम केले, पण वस्तुस्थिती समोर’, अजितदादांचा केंद्रावर निशाणा
- ओबीसी आरक्षण; महाराष्ट्राला इम्पेरिकल डेटा देण्यास मोदी सरकारचा नकार, सुप्रीम कोर्टात सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

