Share

परभणीतील शासकीय रुग्णालयातील आगीच्या चौकशीसाठी समिती गठित

Published On: 

परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावरील जिन्यात ठेवलेल्या साहित्यास लागलेल्या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती गठित केली आहे.

दरम्यान, तीन दिवसात समितीने चौकशी अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात नमूद केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागाच्यावरील मजल्यावर ठेवलेल्या लाकडी सामानास शनिवारी ( दि. ६) रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे दवाखान्यात मोठा हल्लकल्लोळ उडाला. यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले.

अनपेक्षित लागलेल्या या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, महापालिकेचे उपायुक्त गायकवाड यांची सदस्य म्हणून तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, कोरोनासह इतर रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विविध विभागात उपचार करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊ नये, म्हणून आगीच्या घटनेच्या कारणांची चौकशी व्हावी, यासाठी ही समित गठित केली आहे. पुढील तीन दिवसात चौकशी अहवाल सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!