🕒 1 min read
नवी दिल्ली : आपला कोरोना’विरोधातील लढा अजून संपलेला नाही. याचप्रमाणे कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन देखील सुरु आहे. तर दुसरीकडे आरोग्य अधिकारी, पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र पोलिस किंवा आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर होणार्या हल्लांचे प्रमाण देखील वाढले आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना संकटकाळात आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस आपत्कालीन स्थितीत दिवसरात्र लोकांची सेवा करत आहेत. या लोकांवर हल्ला करणे ही घोडचूक आहे ती माफ करु शकत नाही.
https://www.facebook.com/MYogiAdityanath/posts/1189452764730756
‘कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषींविरोधात आपत्कालीन नियंत्रण अधिनियम आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमातंर्गत कठोर कारवाई केली जाईल. त्याचसोबत त्यांच्याकडून करण्यात आलेल्या संपत्तीचं नुकसान भरपाईही सक्तीने वसूल करण्यात येईल,’ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मेडिकल टीम आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

