🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करायचा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी लोकांशी बोलत आहे, जाईल तिथे तरुणवर्ग हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पाठिंबा देत आहे असं विधान केले आहे.
पुढे बोलताना शरद पवार यांनी ‘अनेकांनी शक्तीदेऊन जनतेने प्रश्न सोडण्यासाठी निवडून दिल, थोडी परिस्थिती बदलली की माणस रस्ता बदलतात, बार्शीकर त्यांना जागा दाखवतील हे मला माहित आहे. प्रभाताईपासून सर्वांसोबत आम्ही काम केलं. पण बार्शीकर शब्दाला जागणारे आहेत असं म्हणत दिलीप सोपल यांना टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी शिवसेना भाजपवर टीका करताना ‘मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंनी ही काही लढाईचं नसल्याचं सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतात पण कुस्ती पैलवानाची होते, गृहमंत्री निवडणूक नाही म्हणतात मग ते राज्यात सभा घेयला कशाला येतात, प्रधानमंत्री प्रचाराला येणार आहेत. लढाई नाही मग दिल्लीवाले प्रचाराला कशाला येतायत अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी शहा म्हणतात शरद पवारांनी काय केलं, मी गेली 52 वर्षांपासून निवडून जात आहे. काम केल्यावरच लोक निवडून देतात असं म्हणत शहांना टोला लगावला आहे. तसेच शिवछत्रपतीच्या विचाराचे राज्य आम्ही निर्माण करू म्हणाले. अरबी समुद्रात पुतळा उभा करू म्हणून सांगितले. प्रधानमंत्र्यांनी जलपूजन केलं पण तीन वर्षांपासून तिथे काहीही केलेलं नाही असं पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182919086918864896?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182918845855461377?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182917517443907586?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

