Share

धमक्या देऊ नका आम्ही धमक असणारे लोक, मुख्यमंत्र्यांनी गडाखांना सुनावले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत विरोधकांना चांगलच कोंडीत पकडल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचाराला आले होते. त्यावेळी त्यांनी नेवासा तालुक्यात बडे प्रस्थ असणारे गडाख कुटुंबियांना चांगलच फैलावर घेतले. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकर गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार असून त्यांनी विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केल आहे.

“कोणी उस नेत नसेल तर घाबरू नका बाळासाहेब, सरकार आपलं आहे आपण कारखाना काढू. अन कोणी धमकी देत असेल तर त्यांना सांगा आम्हाला धमक्या देऊ नका आम्ही धमक असणारे लोक आहोत.” अस म्हणत मुख्यमंत्र्यांनी गडाख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर दुसरीकडे जय हरी म्हणून मत मागणाऱ्यांना मत द्या धमकी देऊन मत मागणाऱ्यां मत देऊ नका अस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, २४ तारखेला मुरकुटेंचा असा विजय करा की याचा आवाज उभ्या नगर जिल्ह्यात दुमदुमला पाहिजे. अस आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नेवासा ही संतांची अन देवस्थानांची भूमी आहे याचा विकास होण्यासाठी बाळासाहेब मुरकुटे यांनी एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. तो आरखडा हाय पावर कमिटी पर्यंत पोहचला आहे. मात्र आचारसंहिता आडवी आल्याने त्याला मंजुरी मिळाली नाही. पण आचारसंहिता संपताच हा आराखडा मंजूर करून नेवाशाला विकासाच्या एका उंचीवर नेऊन ठेऊ अस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182578895905624069?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182567264916140032?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182567001350213634?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182557658542305280?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!