Share

‘पवारांना आता पराभव दिसू लागल्याने त्यांची विवेकबुद्धी कमी व्हायला लागलीय’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरवात झाली आहे. त्यामुळे जाहीरसभांमधून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत. या निवडणुकीत मजा येत नाही. कारण समोर कुस्ती लढायलाचं कोणी नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बार्शी येथील सभेत पवारांनी चक्क हातवारे करून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही, असे पवार म्हणाले. हे वाक्य बोलताना पवार यांनी काही आक्षेपार्ह हातवारे केले. हे हातवारे चित्रीकरणात दिसून आले. यानंतर पवारांचे हे हातवारे सोशल मिडीयावर चांगलेचं ट्रोल झाले.

आता पवारांनी केलेल्या या टीकेला जळगावमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलेले राष्ट्रीय नेते पवारांना आता पराभव दिसू लागल्याने त्यांची विवेकबुद्धी कमी व्हायला लागलीय. म्हणून पवार साहेब कशा प्रकारे हातवारे करून बोलत आहेत हे आपण काल बघितलं. उत्तरं आम्हालाही देता येतात. पण असे हातवारे आम्ही कधी केले नाही. आम्ही नटरंगसारखं काम कधी केलं नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नाही. २४ तारखेला महाराष्ट्राची जनताच दाखवेल कोण खरा पैलवान आहे. कुणाला विजय मिळालाय हे दिसेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183311755339894786?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183311430675623936?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!