Share

चंद्रकांत पाटलांचे सर्जिकल स्ट्राईक, 14 बंडखोरांची केली पक्षातून हकालपट्टी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या बंडखोरांवर कठोर कारवाई केली आहे. भाजपच्या तब्बल 14 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप – शिवसेना युती झाल्याने अनेक इच्छुकांची उमेदवारी डावली होती. त्यामुळे अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत युतीच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केली होती.

या सर्व बंडखोरांना अर्ज मागे घेण्याची विनंती भाजप श्रेष्ठींनी केली होती. मात्र काही नेत्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरवातीला निर्वाणीचा इशारा देत 14 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर जागा वाटपात अनेकांची उमेदवारी दोन्ही पक्षाकडून डावलण्यात आली. त्यामुळे आता युतीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182967503313522688?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182965079186165760?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182964788734783488?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!