Share

‘दुसरं कोणी उभे करून उपयोग होणार नाही म्हणून पवार परिवारातील तिघे रिंगणात उतरवायचा प्रयत्न सुरू’

Published On: 

🕒 1 min read

कऱ्हाड (जि. सातारा) : महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनाही दुसरे-तिसरे कोणी उभे करून उपयोग होणार नाही. म्हणून पवार परिवारातील स्वत: शरद पवार, मुलगी सुप्रिया अन् एक नातू असे तिघे रिंगणात उतरवायचा प्रयत्न सुरू असल्याची टीका पाटील यांनी केली आहे

कराडमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,राष्ट्रवादीला लोकसभेला दोन अंकी आकडा गाठायचा आहे; पण ते शक्य नाही.राजकारणात सगळे पत्ते एकदम ओपन करायचे नसतात. अगोदर त्यांनी रिंगणात उतरू देत. मग आमचा उमेदवार कोण, हे सांगतो.

दरम्यान,शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाल्याने माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला जी.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!