पुणे : आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी आंदोलनापासून ते राज्यातील राजकीय घडामोडींवर आपले रोखठोक मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राज्यसरकारचा कारभार त्याचबरोबर एल्गार परिषदेतील उस्मानीच्या भाषणावर देखील वक्तव्य केल तर केंद्र सरकारवर त्यांनी यावेळी तोफ डागली.
‘देशाचा रेव्हेन्यू 19 लाख कोटी, 35 लाख खर्च त्यात 27 कोटींची तूट आहे. सरकार असं म्हणतंय आमची मालमत्ता विकणार आहे. हे सरकार दारुड्या सारखे वागत आहे. जशी ‘दारुड्या झिंग आल्यावर तो घरातील वस्तू विकायला लागतो तसं केंद्र सरकारचं झालं आहे’. शासनाकडे गॅरंटी देण्यासारखं काहीही शिल्लक राहणार नाही’, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशहा सारखे वागत आहे, त्यांचे सरकार दारुड्याचे सरकार झाले आहे. दारुड्या सारखं आहे, कुणाशी बोलावं वाटलं तर बोलतो नाहीतर नाही, अशी विखारी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केली.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

