परभणी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राशनचा 80 क्विंटल तांदूळ गुरुवारी रात्री सेलू येथील रायगडकॉर्नर येथून ताब्यात घेतला.
परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी एका आयशर ट्रकमधून नेला जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या वेळी सहायक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी बालासाहेब तुपसमिद्रे, शेख मोबीन, निळे, रामेश्वर मुंडे आदींनी मारोतीनगर येथून एक ट्रक निघाल्याचे समजताच पथकाने तो ट्रक (एमएच 04 डीडी 3195) सेलू शहरातील रायगड कॉर्नर येथे थांबवला होता. चालकाची चौकशी करत ट्रकमधील साहित्याची तपासणी केली. त्यावेळी त्यात तांदूळ असल्याचे दिसले. या तांदळाबाबत माहिती विचारली असता, चालक उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. आतील मुद्देमालाबाबत संशय अजुनच पक्का झाला. राशनचा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय पथकास आला. ट्रकमध्ये 80 क्विंटल तांदळाच्या पोत्यासह रिकामे पोते, शिलाई करण्याची मशीन देखील सापडली.
पथकातील अधिकाऱ्यांनी तो ट्रक ताब्यात घेवून सेलू पोलिसांच्या स्वाधीन केला. तत्पूर्वी ट्रकमधील साहित्याची मोजणी केली, असता त्यात 107 कट्टे तांदूळ दिसला. 80 क्विंटल तांदूळ यावेळी पथकाने जप्त करुन सेलू पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील गोदामातून तांदूळ घेऊन तो मंठा येथे जात असल्याची माहिती संबंधित चालकाने दिल्याचे समजले. दरम्यान, तांदूळ रेशनचा आहे का? याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक तहसील प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. तहसील प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

