🕒 1 min read
मुंबई : ‘दंगल गर्ल’ बबिता फोगाटनं देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत या वाढत्या संख्येला तबलिगी जमात जबाबदार असल्याच वक्तव्य केले आहे. बबिता फोगाट हिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून हा व्हिडीओ प्रसिध्द केला आहे.
कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है।
जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 15, 2020
या पोस्टवरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. अत्यंत खालच्या पातळीवर तिच्यावर टीका होत असून अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. तर ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही बबिताचे समर्थन केले आहे.
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020
या व्हिडीओमध्ये बबिता फोगाट म्हणते की, मी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. त्यावरून मला शिव्या व धमक्या दिल्या जात आहेत. मात्र मी घाबरणारी मुलगी नाही. मी माझ्या देशाच्या हितासाठी माझ मत मांडले आहे. जर आज तबलिगी समाजाने नियमांचे पालन केले असते तर देश कोरोनामुक्त झाला असता. मात्र तसे झाले नाही. आज तबलिगी सर्वात जास्त कोरोनाबाधित आहेत. तसेच त्यांच्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
सचिन सावंत यांची टीका –
आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फोगट यांच्या ट्वीटवर नापसंती व्यक्त केली आहे तसेच त्यांनी आपल्याला दुख: होत आहे पण #SuspendBabitaPhogat हे बोलावं लागत आहे असेंही ते म्हणाले. त्यांनी ट्वीटरवर आपलं मत मांडल आहे. ते म्हणाले
भारतीय जनता पक्षामधील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच बबिता फोगट यांचाही वापर द्वेष पसरवण्यासाठी केला जात आहे. ते त्यांचे समाज माध्यमांचे हक्क देखील भाजपच्या आयटी टीमला देऊन टाकतात. राजकीय लाभासाठी भाजप त्यांना अडचणीत आणत आहे. आमचे नायक नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होत असल्याचे बघून दुख: होत आहे. क्षमस्व खेदानी बोलावं लागतंय पण -#SuspendBabitaPhogat
#babitaphogat like other celebrities in #bjp are being used as a tool to spread hatred. They even give their SM rights to @BJP4India IT team. BJP is making them stoop for cheap political gains. Can't see our heroes becoming morally corrupt
Sorry to say this-#SuspendBabitaPhogat— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 17, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

