🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ऐन निवडणुकांच्या कार्यकाळात कॉंग्रेसचे राहुल गांधी परदेशात निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळासह अनेकांनी राहुल गांधींवर टीका केली होती. मात्र नुकतीच त्यांची लातूरमधील औस मतदारसंघात प्रचार सभा पार पडली. औस मधील कॉंग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी औसमध्ये जनतेला संबोधित केले. लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर राहुल यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर ते माध्यमांशी फारसे काही बोलले नाहीत. मात्र आज त्यांनी पहिल्यांदाच औसमध्ये भाषण करताना सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, ” देशभरात निवडणूक प्रचारसभेत कोणताही नेता जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाही. मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी चांद्रयान दोन, कलम ३७०, जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर गावाजा केला जातो. मात्र आज देशातील कोणत्याही तरुणाला विचारले तर त्याला चंद्रापेक्षा पोटाची काळजी जास्त आहे. सध्या देशात बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. गरिबांना फायदा होण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी जीएसटीचा निर्णय घेतला मात्र त्याने गरिबांना नाही तर श्रीमंतानाच आशिक फायदा झाला. एकीकडे व्यापारी उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते. मात्र शेत्कायानी कर्ज फेडले नाही तर त्याला तुरुंगात टाकण्यात येते.
त्यानंतर मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, या योजनांचे काय झाले, आज लघु उद्योग बंद पडत आहे, कोणत्याही कंपनीत जाऊन पाहिल्यास तिथे या कोणत्याही योजनांची किती प्रमाणात अमलबजावणी होताना दिसत नाही. उलट तेथे तरुणांना ऐनवेळी कामावरून कमी करण्यात येते. देशात आर्थिक मंदी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. पंतप्रधान चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत असतात. मात्र ते चीनी सैन्याच्या घुसखोरीबद्दल प्रश्न विचारू शकतात का, बड्या उद्योगपतींची १ लाख कोटींची कर्जे माफ केली जातात. पण शेतकऱ्यांची कर्जे काम्फ केली जात नाहीत, ” असे विविध प्रश्न राहुल यांनी यावेळी उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296189271166978?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296661545570304?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

