टीम महाराष्ट्र देशा : राज्यात जोरदार चर्चा असणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेक आमदारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. १४ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचीही चर्चा जोरात होती. मात्र आता तशी शक्यता नसल्याच समोर येत आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारत कोणकोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील वाट्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गर्जना केल्या जात होत्या. विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असल्यामुळे आताचा मुहूर्त टळला तर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार?, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.


