बारामती : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७५ दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यात त्यांनी मोदी सरकारलाही आंदोलन कसं हाताळावं याविषयी सल्ला देत आंदोलकांशी केंद्र सरकारकडून चर्चा करण्यात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कोपरखळी लगावली आहे.
‘पीयूष गोयल हे मुंबईतील आहेत. ते आमचे मित्र आहेत. परंतु पीयूष गोयल आणि शेती यामधलं मला माहिती नाही. पीयूष गोयल हे शेतीतज्ज्ञ आहेत हे ऐकून माझ्या ज्ञानात नवी भर पडली, अस पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
‘कृषी कायद्याबाबत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चर्चा सुरु झाली. त्यानंतर ‘यूपीए’ सरकारच्या काळात आम्ही कृषी कायद्यांबाबत प्रत्येक राज्याचं मत मागवलं होतं. आम्ही यासाठी समितीही स्थापन केली होती. ही समिती मसुदा तयार करुन राज्यांना अभ्यासासाठी दिली होती. परंतु मोदी सरकारने थेट कायदाच लागू केला’, अशी नाराजीही पवारांनी बोलावून दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- महाराष्ट्रात चाणक्य-बिणक्य चालत नसतो ; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला
- ‘महाराष्ट्राच्या भूमीत शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या चेतनेची अनुभूती मिळते’
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- फडणवीसांनी सांगितलं नारायण राणेंच्या यशामागचं रहस्य !


