🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सध्या कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या टी-२० विश्वचषकाला खेळवण्याच्या वेग-वेगळ्या उपायाविषयी बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने यावर एक उपाय सुचवला आहे. त्याच्या मते सर्व क्रिकेटपटूंना चार्टर विमानाने ऑस्ट्रेलिया मध्ये आणावे तसेच त्यांची कोरोनाची चाचणी करावी व रिकाम्या मैदानात सामने खेळवावे. ज्याने करून स्पर्धा पुढे ढकलावी लागणार नाही किंवा रद्दही करावी लागणार नाही.
टी-२० विश्वचषकाची सर्वच देशातील अनेक क्रिकेटप्रेमी वाट बघत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूंना खेळतांना बघण्यासाठी चाहते आतुर असतात. त्यामुळे स्पर्धा रद्द करणे योग्य नाही तसेच स्पर्धा पुढे ढकलणे देखील योग्य ठरणार नाही. कारण पुढच्या वर्षी भारतात पुन्हा टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे सहा ते आठ महिन्याच्या अंतरावर दोन विश्वचषक खेळवणे योग्य नाही. त्यामुळे या पर्यायांची अमलबजावणी करून विश्वचषक खेळवल्यास नियोजित वेळेवर हि स्पर्धा पार पडेल असे मत ब्रॅड हॉगने व्यक्त केले आहे.
तर भारताचे कोच रवी शास्त्री यांनी या उलट म्हटले आहे कि, आज १.४ अब्ज नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. आपण हा लढा जिंकल्यास कोणताही विश्वचषक जिंकू शकतो. सद्या कोरोना पेक्षा कोणताही विश्वचषक महत्वाचा नाही.


