रांची : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आलेल्या नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली असताना अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी जात असताना नवरीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांच्या मदतीने नववधूला पळवून नेले. झारखंडची राजधानी धुर्वा पोलीस स्थानक भागामध्ये ही घटना घडली आहे.
वृत्तानुसार, येथे मोठा धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर नवरीची पाठवणी करण्यात आली. नवरा मुलगा आणि कुटुंबीयांना मारहाण करत सासरी जात असतानाच प्रियकराने नवरीला पळवून नेले. हा सर्व प्रकार नवरीच्या संमतीने झाल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चौकशीत मुलीने प्रियकरासोबत मिळून हा प्लान केल्याचे उघड झाले. मुलीने आणि प्रियकराने पोलिसात शरणागती पत्करली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

