Share

धोनीचा पॅटर्न वापरून धोनीचाच मोठा विक्रम मोडीत, जडेजाची शानदार कामगिरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीदेखील घेतली आहे.

टीम इंडियाने सलामीवीर के. एल. राहुल (51 धावा) आणि रवींद्र जडेजा  या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला. काही दिवसांपूर्वी जडेजा म्हणाला होता की, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याला अंतिम षटकांमध्ये फटकेबाजी कशी करायची याबाबतच्या टिप्स दिल्या होत्या.

शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 44 धावा चोपल्या. भारताला पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून देण्यात जडेजाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.

याआधी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा फंडा वापरलास का? असा प्रश्न विचारला. त्यावर जडेजा म्हणाला,”हो नक्कीच माही भाई प्रदीर्घकाळ टीम इंडियासाठी आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. आणि त्यानं एक पॅटर्न सेट केला आहे.

तो कोणत्याही खेळाडूसोबत प्रथम भागीदारी सेट करतो आणि खेळपट्टीवर तग धरल्यानंतर तो फटकेबाजी करायचा. तो नेहमी सल्ला द्यायचा की भागीदारी सेट झाल्यावर सामन्याच्या अखेरच्या षटकांत जबरदस्त फटकेबाजी कर. त्याला असं करताना मी अनेकदा पाहिले होते आणि त्याच्यासोबत मी अनेकदा खेळलो आहे. तो नेहमी सांगायचा, आपण सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला तर अखेरच्या चार-पाच षटकांत धावा येणारच.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!