Share

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये बॉक्सर मंजू राणीचा अंतिम फेरीत पराभव

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारताची युवा बॉक्सर मंजू राणीला जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये रशियाची एकातेरिना पाल्टसेवाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. एकातेरिनाने ४८ किलो वजनी गटातून ४-१ अशी मंजूला मात दिली. या पराभवानंतर राणीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

वयाच्या १८ व्या वर्षात  जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारी मंजू एकमेव भारतीय होती. २००१ साली मेरी कोमने अशी कामगिरी करुन दाखवली होती. मात्र मंजूच्या पराभवानंतर भारताचं जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पहिल्या फेरीपासून राणी आणि तिचा प्रतिस्पर्धी आक्रमक खेळी केली. पहिल्या तीन मिनिटांत रशियन बॉक्सरने जोरदार बॉक्स लावले. तर दुसर्‍या फेरीत राणीने चांगली खेळी करत स्थानिक बॉक्सरवर मात केली. मात्र शेवटच्या तीन मिनिटांत बाजी पाल्त्ल्याने रशियन बॉक्सरला विजेता घोषित करण्यात आले.

दरम्यान मंजूने पहिल्यांदाच या चॅम्पियनशीप भाग घेतला होता. मंजूनं शनिवारी उपांत्य फेरीत ४८ किलो वजनी गटात माजी कांस्य पदक विजेता थायलंडची चुथामाथ काकसात हिचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मंजूव्यतिरिक्त मेरी कोम जमुना बोर आणि लवलिना बोरगोहेन (६९) यांनाही उपांत्य फेरीत पराभव पत्करून कांस्य पदकावर समाधान मागावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1183346115015348224?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183349253772464128?s=20

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!