Share

‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली तरी अपेक्षित निकाल आले नाहीत’

Published On: 

पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी यांनी यासंदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली. गावडे म्हणाले, भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीतून काही ना काही शिकत असतो या निवडणुकीतूनही योग्य तो बोध घेऊ, विधान परिषद निवडणुकांनाचा कौल आम्ही विनम्र पणे मान्य करतो, या निवडणुकीसाठी भाजप च्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली तरी अपेक्षित निकाल आले नाहीत. त्यामुळे निश्चितच कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू व येत्या काळात आणखी जोमाने काम करू.पदविधरांचे प्रश्न अधिक आक्रमक पणे सरकार समोर मांडू व त्यासाठी संघर्ष करू असं देखील ते म्हणाले.

भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी देखील यासंदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. निवडणुकीत जय व पराभव होतच असतात. प्रत्येक निवडणुक काही तरी शिकवत असते. या निकालामुळे आम्ही आत्मपरीक्षण करु व यापुढेही लोकांना अपेक्षीत कार्य करत राहु असं वाघ म्हणाले आहेत.

दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. ह्या निकालांमध्ये भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला. यातही भाजपला आनंद वाटण्याचे फारसे कारण नसावे. कारण तो उमेदवार भाजपने काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार आहे असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!