🕒 1 min read
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.
मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.
यानंतर, शिवसेनेनं देखील चोख उत्तर देत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असं ठणकावलं होतं. पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्र लढत भाजपला रोखलं आहे. आजच, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी, ‘‘मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकीत आम्ही एकत्र राहू. कारण एकत्र राहण्याचे फायदे हे कालच्या निवडणुकीत दिसले.’ असं सूचक वक्तव्य करत मुंबई महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडं, काल भाजपने हैद्राबाद महापालिका निवडणुकीमध्ये ४ जागांवरून ४८ जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. यानंतर, भाजपला मुंबई महापालिका काबीज करण्याचे वेध लागले आहेत. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी, ‘ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने बिहारमधील विजयानंतर हैद्राबादमध्ये ज्याप्रकारे विजय मिळवला आहे यावरून सिद्ध होत कि देशाचा मोदींच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे. लोकांनी विकासाची साथ धरली आहे. बीएमसीवर भाजपचाच भगवा फडकेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.’ अशी गर्जनाचं त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में भाजपा को बिहार में जीत और फिर हैदराबाद में जिस तरह की सफलता मिली यह बताता है कि देश को मोदी जी के नेतृत्व पर कितना भरोसा है, लोगो ने विकास की बात मान ली है। हमे पूरा विश्वास है कि BMC पर भी भाजपा का भगवा लहराएगा।
— Ram Kadam (@ramkadam) December 5, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी समाजाचा आवाज दाबला जातोय’; समीर भुजबळांच्या अटकेवरून माळी समाज आक्रमक
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- संजय राऊत म्हणतात…’उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर’
- पुणे जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्यापासून कडक संचारबंदी!
- ‘सरकार आजचं दुखणं उद्यावर ढकलत आहे’; एमपीएससी परीक्षांच्या मुद्द्यावरून भाजप आमदाराचा निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

