Share

‘भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय’

Published On: 

मुंबई   – भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी डिलीट केलेलं ट्वीट आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. भाजपच्या या नीतीवर . नवाब मलिक यांनी प्रहार केला आहे.

ज्याप्रमाणे गुजरातला १ हजार कोटी दिले तसेच नुकसान झालेल्या राज्यांना विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांना आर्थिक मदत देण्याचं ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीजी यांनी केलं. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. याआधी नितीन गडकरी यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. ट्वीट डिलीट होतेय. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेतायत म्हणजे अंतर्गत बोलण्याचा अधिकार नाही हे यातून सिद्ध झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!