🕒 1 min read
मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली होती. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असं म्हणत अंतरिम जामीन नाकारला होता. तर, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करत दिलासा दिला होता.
आता, याप्रकरणी पुन्हा एकदा अर्णबच्या अडचणीत वाढ होऊ शकतात. काल (दि. ४ डिसेंबर) रोजी रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तर, आज अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी याच्यासह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत.
याप्रकरणी भाजपने ठाकरे सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप करत आक्रमक पवित्र घेतला होता. आता अर्णबवर आरोपपत्र दाखल केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. ‘बेशरम ठाकरे सरकारचे सूडचक्र थांबण्याचे चिन्ह नाही… अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाशी अर्णव गोस्वामीचा संबंध जोडता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा सुस्पष्ट निकाल धाब्यावर बसवून गृहमंत्र्यांच्या सूचक आदेशावरून आरोपपत्र दाखल.’ असा गंभीर आरोप देखील त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला आहे.
बेशरम ठाकरे सरकारचे सूडचक्र थांबण्याचे चिन्ह नाही…
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाशी अर्णव गोस्वामीचा संबंध जोडता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा सुस्पष्ट निकाल धाब्यावर बसवून गृहमंत्र्यांच्या सूचक आदेशावरून आरोपपत्र दाखल. pic.twitter.com/Z6B9s0Xkud— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- प्रताप सरनाईकांच्या चौकशीसाठी ईडी अद्याप वेटिंगवरच! वाढीव मुदतीची केली मागणी
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

