🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून नागरिकांना धान्य आणि इतर अत्यावश्यक सुविधा राज्य सरकार देत आहे असं सरकारी पक्षांकडून दावा केलं जात आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारकडून केलेले प्रयत्न पुरेसे नाही अशी टीका होत आहे.
आता भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील रेशन दुकानांवर नागरिकांना अडचणी येत आहेत , त्यांना धान्य मिळत नाही परंतु राज्य सरकार जाहिरात आणि प्रसिद्धीमध्ये अडकलेलं आहे असा घणाघात केला आहे. त्यांनी ट्वीटरवरून ही टीका केली आहे.
काय म्हणाले आमदार राम सातपुते –
‘महाराष्ट्रात सावळा गोंधळ सुरु आहे … रेशन दुकान विषयात सरकारच धोरण स्पष्ट नाही.. जाहिरात आणी प्रसिद्धी मध्ये अड़क़लेल हे सरकार गोरगरीब जनतेची कुचंबना होताना उघड्या डोळ्यानी बघत आहे. ही वेळ टीका करायची नाही पण सरकारचे डोळे उघडणार तरी कसे …?’
‘महाराष्ट्रात सरसकट गोरगरिबांना रेशन द्यायला हवे . जनता व्याकुळ होऊन आम्हा लोकप्रतिनिधीला संपर्क करत आहे. अशावेळी आमचा पण नाईलाज होतो. कोणाच online नाही , नोंदनी नाही. असले कारण सांगीतले जातात. अशा कठीण प्रसंगी जनतेला वार्यावर सोडु नका.’
महाराष्ट्रात सावळा गोंधळ सुरु आहे …
रेशन दुकान विषयात सरकारच धोरण स्पष्ट नाही..
जाहिरात आणी प्रसिद्धी मध्ये अड़क़लेल हे सरकार गोरगरीब जनतेची कुचंबना होताना उघड्या डोळ्यानी बघत आहे.
ही वेळ टीका करायची नाही पण सरकारचे डोळे उघडणार तरी कसे …? @OfficeofUT @Dev_Fadnavis— Ram Satpute (@RamVSatpute) April 16, 2020
महाराष्ट्रात सरसकट गोरगरिबांना रेशन द्यायला हवे . जनता व्याकुळ होऊन आम्हा लोकप्रतिनिधीला संपर्क करत आहे. अशावेळी आमचा पण नाईलाज होतो. कोणाच online नाही , नोंदनी नाही. असले कारण सांगीतले जातात. अशा कठीण प्रसंगी जनतेला वार्यावर सोडु नका.@OfficeofUT @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
— Ram Satpute (@RamVSatpute) April 16, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

