🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरवात झाली आहे. त्यामुळे जाहीरसभांमधून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत. या निवडणुकीत मजा येत नाही. कारण समोर कुस्ती लढायलाचं कोणी नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बार्शी येथील सभेत पवारांनी चक्क आक्षेपार्ह हातवारे करून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांचे हे प्रत्युत्तर भाजपला चांगलेचं झोंबले आहे. इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसानं असं करणं शोभत नाही, अस म्हणत भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तर शरद पवारांचा तोल आधीचं गेला होता. आता पराभवाच्या भीतीनं पवार अधिकच बिथरले आहेत,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शी येथे आले होते. यावेळी शरद पवार यांनी भाजप – शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनतर पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचाही समाचार घेतला. विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं.
यावर बोलताना ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही, असे पवार म्हणाले. हे वाक्य बोलताना पवार यांनी काही आक्षेपार्ह हातवारे केले. हे हातवारे चित्रीकरणात दिसून आले. यानंतर पवारांचे हे हातवारे सोशल मिडीयावर चांगलेचं ट्रोल झाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182952221744361472?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182930667455172608?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182930312373784582?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

