🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या थैमानामुळे दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मात्र, राज्य सरकार दहावीच्या परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. आता दहावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबतचे निकष व अकरावी प्रवेश कशा पद्धतीने होणार याबाबतचा जीआर राज्य सरकार काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या बैठकांच सत्र काल व आज असे दोन दिवस सुरु आहे. दहावीचा निकाल व अकरावीचे प्रवेश यासाठीचे दोन जीआर उच्च न्यायालयात सादर केले जातील. त्यामुळे उच्च न्यायालय पुढील सुनावणीत काय भूमिका घेणार हे महत्वाच ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड नाही तर सगळ्यांसमोर चर्चा झाली; सामंतांचे स्पष्टीकरण
- ‘मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’ का लिहीत नाही?’, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
- ‘ “रेनिसान्स स्टेट” या पुस्तकावर देशभरात कायमची बंदी घाला आणि विक्री झालेली पुस्तकं…’
- महिला खेळाडू आणि बीसीसीआयच्या वादात इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाची उडी
- अभिनेता कुणाल खेमूला लग्नाआधी खावे लागले होते सोहाच्या हातचे करपलेले जेवण


