🕒 1 min read
नवी दिल्ली:- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी विधेयके संसदेत मंजुर झाल्यानंतर राज्याराज्यात आंदोलन करणारे शेतकरी कायदा अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीत येऊन धडकले आहेत. मागील आठवडाभरापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकला असून, सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. आतापर्यंत चार फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चारही वेळा चर्चा फिस्कटली. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे.
आज शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि केंद्रीय मंत्री यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. आज (शनिवारी) या आंदोलनाचा नववा दिवस आहे. या चर्चेच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसंच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहचले आहेत. आज दुपारी २ वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शेतकरी सकारात्मक पद्धतीनं विचार करत आपलं आंदोलन मागे घेतील अशी मला आशा आहे, असे मत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत मोदी सरकारनं तीन कृषी कायदे केले. या कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. आधी राज्याराज्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

