Share

Big Breaking : सोलापुरात कोरोनाचे आणखी दहा रुग्ण पॉझिटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : सोलापुरात कोरोनाचे आणखी दहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून याआधी  दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या 42 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे .

जे दोन रुग्ण सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी सापडले .यातीलच एक मृत पॉझिटिव्ह व्यक्तीचा नातेवाईक पैकी एक आहे . तर इतर 9 पॉझिटिव्ह हे त्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील आहेत. हे सर्वजण पाच्छा पेठ परिसरातीलच आहेत. यामुळे सोलापुरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज दुपारी बारा वाजेपर्यंत 12 इतकी झाली असून, यातील एक व्यक्ती यापूर्वीच मृत्यू पावला आहे.तर बाकी सर्व 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांनी सरकारी यंत्रणेच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा. सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुरवातीच्या काळात  एकही   कोरोना रुग्ण नव्हता मात्र काही दिवसांपूर्वी एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर केलेल्या तपासणीत त्याला कोरोना असल्याचे आढळून आले. हा अहवाल आल्यानंतर सोलापूर प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करून शहरात औषध फवारणी करून सॅॅनीटराईज करण्यात आले होते. मात्र आता आल्या बातमीनुसार सोलापुरात कोरोनाचे आणखी दहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोलापुरातही कोरोना   आपले हात पाय पसरवत असल्याचं दिसत आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याच दिसत आहे. कारण गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांचा आकडा 2916वर गेला आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 12380वर गेला असून आतापर्यंत 414 जणांचा   मृत्यू झाला आहे.

राज्यातील मुंबई – पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. तर  बुधवारी तब्बल 55 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पुणे जिल्ह्यात एकूण 437 रुग्ण झाले आहेत. कालच्या दिवसात पुण्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 43 झाला आहे. भवानी पेठेत आतापर्यंत एकूण 96 रुग्ण सापडले आहेत.

…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!