अहमदाबाद:- गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनसुख वसावा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसुख वसावा यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसुख वसावा हे भरूच मतदारसंघाचे खासदार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मनसुख वसावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. याच नाराजीतून वसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. माझ्या चुकीमुळे पक्षाला फटका बसत आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे वासवा यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच गुजरात सरकारने नर्मदा जिल्ह्यातील 121 गावांचा eco sensitive zone मध्ये समावेश केला होता. मनसुख वसावा यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते आपल्या लोकसभा सदस्यत्त्वाचाही राजीनामा देणार असल्याचे समजते.
भाजपने मला खूप काही दिले. माझी आजपर्यंतची वाटचाल पक्षाची मूल्य आणि आदर्शाला अनुसरून होती. मी एक सामान्य माणूस आहे. मात्र, आदिवासींशी संबंधित असलेल्या काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत असलेल्या मतभेदांमुळे आपण भाजपमध्ये राहू शकत नाही, असे वसावा यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


