टीम महाराष्ट्र देशा : भोर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार कुलदीप कोंडे यांनी १८०० मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस उमेदवार संग्राम थोपटे हे पिछाडीवर पडले आहेत. भोर विधानसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र कुलदीप कोंडे यांनी मोठी मुसंडी मारली असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यात झालेल्या मागील २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी 78 हजार 602 एवढी मते घेत विजय मिळवला. भोर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे कुलदीप कोंडे होते. त्यांना 59 हजार 651 मते मिळाली.
UPDATE
भाजप : 111
शिवसेना : 73
कॉंग्रेस : 37
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 50
वंचित : 1
मनसे : 1
https://twitter.com/Maha_Desha/status/1187235710090104832?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187234249910284289?s=20


