Share

स्वाभिमानीला मोठा धक्का, या संस्थापक सदस्याने सोडली शेट्टींची साथ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कोल्हापूर जिल्ह्यात स्वभिमानीला मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजू शेट्टींची चिंता वाढली आहे.

कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे हे स्वभिमानीच्या स्थापनेपासून शेट्टी यांच्यासोबत होते. काटे यांनी ऊस दराबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. परंतु त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांना यापूर्वीही धक्का बसला होता. स्वभिमानीचे नेते रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत याच्या रयतक्रांती या पक्षात प्रवेश केला. रयत क्रांती संघटना पदाधिकारी राज्यव्यापी मेळाव्यात ,रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी रविकांत तूपकर यांच्या सोबत रणजीत बागल आणि पुजाताई झोळ यांनीही रयत क्रांतीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीतही ते आघाडीसोबत होते. परंतु शेट्टी यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182606572242882560?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182605128316010496?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182601560250966017?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!