Share

मालिकेपूर्वी शुभमन गिलने रोहित शर्मा आणि विराटबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले. टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे.

या ब्रेकमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी खेळाडू जय्यत तयारी करताना दिसत आहेत. शुभमन गिलची इंग्लंड दौऱ्यावर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गिल सध्या टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंसह मुंबईत 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. मागच्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर इंग्लंडचा त्याचा हा पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्याआधी गिलने रोहित शर्मा आणि विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

गिल म्हणाला, गिलने भारताकडून आतापर्यंत 7 टेस्ट खेळल्या आहेत. मेलर्बन टेस्टमधून त्याने पदार्पण केलं. या काळात रोहित आणि विराटसोबत काय बोलणं झालं? याबाबत गिलने सांगितलं. ‘विराट कोहलीसोबत जेव्हा चर्चा होते तेव्हा तो मला कशाचीही पर्वा न करता खेळायला सांगतो. तो मानसिकतेबाबत खूप बोलतो आणि स्वत:चे अनुभव सांगतो. पण रोहितसोबत बोलतो तेव्हा तो बॉलर कुठे बॉल टाकेल, परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार धोका कधी पत्करायचा आणि कधी नाही, हे सांगतो.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!