Share

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसाचार प्रकरणाचे बीडमध्येही कनेक्शन

Published On: 

बीड : प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला यामुळे गालबोट तर लागले. शिवाय दिल्लीतील हा सर्व प्रकार संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान या हिसांचारानंतर दिल्ली पोलिसांकडून तांत्रिक बाबींच्या आधारे अनेकांवर गुन्हे दाखल होऊन त्याचा तपासही सुरू आहे. याच तपासाच्या अनुषंगाने शनिवारी रात्री दिल्ली सायबर शाखेचे पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक माहिती घेण्यासाठी बीडमध्ये धडकले. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील अधिकाऱ्यांची चर्चा करुन नंतर या पथकाने शहरातील काही जणांचे पत्ते शोधून काढत झाडाझडती घेत त्यांची चौकशीही केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बीड येथील स्थानिक दैनिक ‘लोकप्रश्न’ने वृत्त प्रकाशित केले आहे.

दिलेल्या बातमीनूसार, शनिवारी रात्री साधारण नऊच्या सुमारास दिल्ली सायबर सेलचे पो.नि.सज्जनसिंग व त्यांच्या पथकातील कर्मचारी बीडमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने त्यांनी बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस हद्दीबाहेर जावून चौकशी करण्यासाठी संबंधित ठाणे प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार दिल्ली पोलीसांनी शिवाजीनगर ठाण्यात येवून त्यांना हव्या असलेल्या संशयितांच्या पत्त्याबाबत तसेच अधिकची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याकडून जाणून घेत शहरातील काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. अधिक तपासासाठी काही जणांना ताब्यातही घेतल्याची खास सुत्रांकडून समोर आली आहे.

दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी मात्र याबाबत अधिक माहिती दिली नाही. आवश्यक ती माहिती जाणून चौकशी करून सायबर सेलचे पोलीस पुन्हा दिल्लीला रवाना झाले. शिवाजीनगर ठाणे हद्दीतून काही संशयितांची पोलीसांनी कसून चौकशी केली असून या चौकशीदरम्यान नेमके कोणाला ताब्यात घेतले हे गुलदस्त्यात आहे. पंरतु दिल्लीत प्रजासत्ताक दिनादिवशी झालेला प्रकार आणि त्या प्रकरणाच्या चौकशीकामी दिल्ली सायबर पोलीस बीडमध्ये पोहोचल्याने दिल्ली प्रकरणाचे बीड कनेक्शन नेमके काय? अशी प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून फक्त चौकशीची माहिती
दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडी प्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा दिल्ली सायबर पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी शनिवारी दिल्ली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सज्जनसिंग आणि त्यांचे पथक माहिती घेण्यासाठी ठाण्यात येऊन भेटले. त्यांनी काही जणांची गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली आहे. ते अधिक तपास करत आहेत अशी माहिती शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!