औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढतच आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल १५६ नव्या रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, केवळ चार तासांत चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या १२५० इतकी झाली आहे. सर्व मृत रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागातील ३८ वर्षीय बाधित पुरुष रुग्णाला गुरुवारी (१८ फेब्रुवारी) शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री दहा वाजता रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील ७५ वर्षीय बाधित महिला रुग्णावर १२ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. या रुग्णाचा गुरुवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला.
शहरातील चिकलठाणा परिसरातील सविता मंगल कार्यालय परिसरातील ६५ वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर सहा फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनिटांनी मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील करमाड तालुक्यातील वरुड काझी परिसरातील ५२ वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर ४ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. या रुग्णाचा गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीमध्ये ९७६ बाधितांचा, तर औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १२५० बाधितांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.
जिल्ह्यात सध्या ६०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार १३५ झाली आहे. यात आतापर्यंत ४६ हजार २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १५६ रुग्णांत मनपा हद्दीतील १३३, ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ मुलीचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यात सापडला
- ‘मुख्यमंत्री न होता विरोधकांचा नेता झाल्याने फडणवीसांची आकसातून टीका’
- परभणीत सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस
- ‘ठाकरेंची सत्ता असलेला हा महाराष्ट्र आहे जिथे मटन पार्टीला परवानगी आहे मात्र शिवजयंतीला नाही’
- नेटकऱ्यांनी झापल्यावर अमिताभ बच्चनची अक्कल आली ठिकाण्यावर, महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख


