🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसापासुन बीसीसीआय भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघात भेदभाव करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. इंग्लंड दौऱ्याबाबत जे आरोप करण्यात आले त्यावर महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी पुढे येत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी १९ मे रोजी महिला क्रिकेटपटुच्या वार्षिक करार जाहीर होताच पुन्हा या चर्चाना उत आला होता.
याचदरम्यान बीसीसीआयचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद पटकावले होते. स्पर्धा संपल्यानंतर उपविजेतेपदाची विजयी रक्कम आयसीसीने बीसीसीआयकडे पाठवली होती. एकुण ५ लाख डॉलर्स इतकी ही रक्कम होती. संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ३३ हजार डॉलर्स रक्कम मिळायला हवी होती.
मात्र अद्यापही बीसीसीआयने ही रक्कम खेळाडुंना वितरीत केलेली नाहीये. याबाबत आता बीसीसीआयला पुन्हा प्रश्नांचा भडिमार होताना दिसत आहे. काही दिवसापुर्वी जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या रकमेवरून आधीच बीसीसीआय वादात सापडली होती. या वादावर स्म्रिती मंधानाने पुढे येत बाजू सावरली होती. भारतीय महिला क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला पुरुष आणि महिला संघ एकाच विमानाने जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
- देवमाणूस : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार रतन टाटा आधार
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान


