Share

बारामती पॅॅटर्न आता सासवड शहरातही लागू होणार, अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार

Published On: 

🕒 1 min read

सासवड : बारामतीनंतर आता सासवड नगर पालिकेने देखील सासवड शहर 3 मेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरंदर तालुक्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही, पण आजूबाजूच्या सर्व तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून सासवड नगर पालिकेने शहर आणि आजूबाजूची गावं ही 3 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय पुरंदरचे आ. संजय जगताप, सासवड शहराचे नगराध्यक्ष मार्तंड बोंडे, तहसीलदार रुपाली सरनोबत आदि. मंडळींच्या उपस्थितीत झाला.पुरंदर हे मध्यवर्ती असल्याने बारामती, भोर, पुणे, हवेली, या तालुक्यांना जोडलेले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये कोरोनाने बऱ्या पैकी हातपाय पसरवले आहेत, त्यामुळे पुरंदरला याचा संसर्ग होऊ नये म्हणून पुरंदर तालुका आणि सासवड शहर लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे, असे संजय जगताप म्हणाले.

तसेच बारामतीमध्ये ज्या प्रमाणे अत्यावश्यक सेवा घरपोच नेऊन पोहोचवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे सासवड शहरातही वार्ड निहाय 10  स्वयंसेवक नेमून अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार आहेत. या स्वयंसेवकांचे फोन नंबर नागरिकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत, अशी माहितीही जगताप यांनी दिली.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!