🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यात मंगळवारी वांद्रे येथे झालेल्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण आला होता.
त्यात खोट्या बातमीमुळे नागरिकांचा गैरसमज होऊन ही गर्दी झाली असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे ABP माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे. वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर उस्मानाबाद पोलिसांनी पहाटेच त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला पाठवलं.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं काल सकाळी दाखवलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं राहुल कुलकर्णींनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावादेखील करण्यात आला.
दरम्यान राहुल कुलकर्णी यांनी काल रात्री ट्वीटरवर त्यांनी ज्या आधारे ही बातमी दिली होती ते पत्र दाखवलं आहे. तसेच आपण ट्रेन कधी सुरु होणार आहे हे सांगितलं नव्हतं असही म्हटलं आहे
आनेक गणमान्यांनी मला ट्रोल करण्याची संधी साधली. त्यातल्या किती जणांनी सकाळी ९ वाजता मी दिलेली बातमी पाहिली हे माहित नाही. कधी ट्रेन सूरू होनार हे आम्ही सांगितले होते का…? आता हे रेल्वेचे पत्र वाचा. pic.twitter.com/O46QTqnbOc
— Rahul Kulkarni (@RahulAsks) April 14, 2020
रेल्वेचं स्पष्टीकरण –
आता ‘लल्लनटॉप डॉट कॉम’ या वृत्त संकेतस्थळाने रेल्वेचं या पत्रका संदर्भात स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं आहे.
दक्षिण मध्य रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांसाठी जनसाधारण ट्रेन चालवण्याचा विचार करीत असल्याची चुकीची माहिती वेब मीडियाच्या एका विभागाने दिली आहे. ही बातमी अंतर्गत संप्रेषणासाठी व्यावसायिक विभागाला पाठविलेल्या पत्रावर आधारित आहे. या संदर्भात हे स्पष्ट केले आहे की अडकलेल्या प्रवासी कामगारांसाठी कोणतीही जनसाधारण विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. नमूद केलेली तथ्ये लक्षात घेता प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी लक्ष द्या. कृपया या विषयावर कोणतीही खोटी बातमी चालवू नका.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

