🕒 1 min read
कोल्हापूर : पत्रकार गिरिश कुबेर यांच्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप देखील काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.
आता भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील गिरीश कुबेर यांचा निषेध केला असून “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर महाराष्ट्रासह देशभरात कायमची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तसेच, या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या संस्थेला देखील त्यांनी पत्र लिहिलं आहे.
संभाजीराजे यांची पोस्ट –
गिरीश कुबेर यांच्या “रेनिसान्स द स्टेट” या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध !!
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1881437392014471
छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. काहितरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी, किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या प्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोक करत असतात, यापैकीच एक हे असावेत. ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत. सरकारने या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरीत करावी.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड नाही तर सगळ्यांसमोर चर्चा झाली; सामंतांचे स्पष्टीकरण
- ‘मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’ का लिहीत नाही?’, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
- कोरोनाची तिसरी लाट आली? बीड जिल्ह्यात ८ हजार बालके कोरोना बाधित!
- महिला खेळाडू आणि बीसीसीआयच्या वादात इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाची उडी
- अभिनेता कुणाल खेमूला लग्नाआधी खावे लागले होते सोहाच्या हातचे करपलेले जेवण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

