Share

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशनवर बंदी; रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास थेट रुग्णालयात भरती

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका वेळीच ओळखून परिथिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. अनेक ठिकाणी होम आयसोलेशन म्हणजेच घरीच विलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण हे बिनधास्त बाहेर फिरत असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने आता होम आयसोलेशनवर बंदी घालण्यात आली आहे.

सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील पहिली म्हणजे, होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे आता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घरी विलगीकरण न करता = कोविड सेंटर/रुग्णालयांमध्ये आयसोलेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!