Share

कोरोना लढ्यासाठी केंद्राने आमच्या हक्काचे 16 हजार कोटी तातडीने द्यावे – बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरातील करोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. अशात आता आज ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ इतकी झाली आहे.

तर दुसरीकडे मसहूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या राज्यात कोरोना लढ्यासाठी या पैशांची गरज आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे या पैशांची मागणी केली जात आहे. केंद्राकडे आमच्या हक्काचे 16 हजार कोटी रुपये थकीत आहेत. मात्र पैसे मिळत नसल्याचं मत थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन पत्रकार आयोजित केली होती. यावेळी पुढे थोरात म्हणाले, ‘स्वतः मुख्यमंत्री ठाकरे, सर्व मंत्री आणि सर्वच सरकारी यंत्रणा राबत आहे, प्रयत्न करत आहेत. आमच्या केंद्राकडून निश्चित काही अपेक्षा आहेत. यात राजकारण करायचं नाही, पण या अपेक्षा आहेतच. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या हक्काचा जो वाटा आहे हो 16 हजार 656 कोटी रुपये इतका आहे. तो आम्हाला तातडीने मिळणं आवश्यक आहे’.

दरम्यान, ‘आम्ही वांद्र्याच्या प्रकरणात राजकारण करू पाहत नाही. ते रेल्वेच्या चुकीमुळे झाले आहे. १४ तारखेला दुपारपर्यंत रेल्वेचे बुकिंग सुरू होते. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज झाला होता. त्यासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!