Share

बाळासाहेब थोरातांची कॉंग्रेसच्या विधिमंडळ विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  कॉंग्रेसचे विधिमंडळ विरोधी पक्ष नेतेपदी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व  विधिमंडळ विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत, विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामाही दिला होता. विखे यांच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळ विरोधी पक्ष नेतेपदीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आघाडीवर होती.

याचदरम्यान, कॉंग्रेसच्या विधिमंडळ विरोधी पक्ष नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. तसेच, विधानसभेतील गटनेतेपदी आ. विजय वडेट्टीवार, उपनेतेपदी आ.नसिम खान, मुख्य प्रतोद बसवराज पाटील, प्रतोदपदी के. सी. पडवी, सुनिल केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट करत सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!