🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळी करण्यात आलेली अटक ही वरिष्ठांच्या हट्टापायी करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती असं पवार म्हणाले आहेत.
याविषयी पुढे बोलताना पवार यांनी ‘त्या काळात आमचेही स्वतःचे मत होते की, इतक्या टोकाचे राजकारण कोणी करू नये, त्या वेळी आमच्या मताला एकढी किंमत नव्हती. त्या केळी काही जणांच्या हट्टापायी तसे करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे ते जेष्ठ नेते कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढे बोलताना अजित पवार यांनी ‘बाळासाहेबांना अटक करण्याच्या निर्णयाबाबत आम्ही त्या वेळी संबंधित व्यक्तीला विचारले की, असं का करताय? तेव्हा ते म्हणाले, आम्ही विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य काटते तो निर्णय घेणार आहोत असं त्या व्यक्तीने सांगितल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी या मुलाखतीमध्ये इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182871712611749890?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182871163002736646?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182862457238220800?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

