🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा;- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले नेते गावो गावी जाऊन नागरीकांच्या भेटी घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर परतूर मंठा विधानसभा मध्ये कोण बाजी मारणार याकडे पुर्ण मतदारांचे लक्ष लागले आहे. बबनराव लोणीकर यांनी परतूर सह पुर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली गेली आहेत . तसेच परतूर शहरातील नगर परिषद एक हाती सत्ता सुरेश जेथलीया यांच्याकडे असुन त्यांनी परतूर शहरात काही खास विकास कामे केली नसल्याचे दिसतात.
मात्र लोणीकर यांनी परतुर शहरात नाट्यगृह ,परतुर शहरातील मुख्य रस्ता,क्रिंडागंणासाठी 15 कोटी चा निधी , मुलांसाठी वसतीगृह, तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी वाॅडर ग्रीड 350 कोटीची योजना जीचा फायदा 176 गावाला होणार असून यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
तसेच मतदारसंघांतील अनेक ग्रामपंचायती ह्या लोणीकर यांच्या ताब्यात आहे.त्याबरोबर परतूर पंचायत समिती ही भाजपची आहे.तसेच बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे जिल्हा परिषद निवडणुकीत आष्टी सर्कल मधुन मराठवाड्यात सर्वाधिक मतानी निवडून आलेले असल्यामुळे सर्वच बाजूने लोणीकर हे जेथलीया यांच्या पेक्षा वरचढ दिसुन येतात.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182975233327656960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182974537270349826?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

