Share

आम्ही आत्मपरीक्षण करु व यापुढेही लोकांना अपेक्षीत कार्य करत राहु -अवधूत वाघ

Published On: 

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी यासंदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. निवडणुकीत जय व पराभव होतच असतात. प्रत्येक निवडणुक काही तरी शिकवत असते. या निकालामुळे आम्ही आत्मपरीक्षण करु व यापुढेही लोकांना अपेक्षीत कार्य करत राहु असं वाघ म्हणाले आहेत.

दरम्यान,  आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरणे भाजपच्या अंगाशी आले आहे. पण त्याच वेळेस पदवीधर मतदारांनी पक्षीय हितसंबंधांना झुकते माप दिल्याचे दिसते आहे.

ते म्हणाले,कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर खरे तर शिक्षित मतदाराने या निवडणुकीद्वारे आशा आकांशा आणि धोरणात्मक दिशाबाबत अपेक्षा व्यक्त करायला हव्या होत्या, परंतु तसे झालेले नाही. पश्चिम महाराष्ट्रात असलेला साखर आणि सहकार क्षेत्राचा प्रभाव या निकालातही स्पष्टपणे दिसतो आहे. उमेदवाराची स्वच्छ प्रतिमा ,काम, अभ्यास असला तरी आम आदमी पार्टीसाठी ही दीर्घकालीन लढाई आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!