🕒 1 min read
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना मोठे महत्व असते. या निवडणुकीत कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला निवडुन आणण्यासाठी झटून कामाला लागले आहे. यात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी. भाजपच्या महिला मोर्चातर्फे सक्रीयपणे उमेदवारांसाठी सकाळीपासून सायंकाळीपर्यत प्रचारात लागल्या आहेत. भाजप महिलांना मोर्चाच्या ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क तयार झाला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे.
ग्रामीण भागात भाजपच्या महिला मोर्चाची मोठी शक्ती आहे. भाजपने जसे बुथ गठबंधन गेले. त्यात एक बुथ 21 युथ केले. त्याच प्रमाणे महिला मोर्चाचेही मोठे संघटन केले आहे. औरंगाबाद ग्रामीण महिला मोर्चाची मोठी संघटन आहे. सध्या अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून हे संघटन कार्यरत आहे. दोन महिन्यापुर्वी रक्षाबंधना निमित्ताने महिला मोर्चातर्फे 21 लाख राख्य पाठविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यांचे समन्वयक म्हणून चव्हाण यांनी काम पहिले. जिल्ह्यातून काही लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या होत्या. यासह सध्या विधानसभा निवडुकीत प्रचारांची मुख्य धुरा महिला मोर्चांनी हाती घेतली आहे. घरोघरी जात महिलांसाठी केलेले कामे हे पोहचविण्यात येत आहे.
औरंगाबाद ग्रामीण लाखो महिलांचे संघटन महिला मोर्चाच्या माध्यामतून सुरु आहे. या महिला सरकारने केलेल्या कामाचे महत्व पटवून सांगत आहे. फुलंब्रीत महायुतीचे उमेदवार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारातही महिला मोर्चाच्या अुनराधा चव्हाण आणि इतर पदाधिकारी झटून कामाला लागेले आहेत. महायुतीच्या उमदेवारास मोठ्या लिडने विजयी करण्याचा संकल्पही या महिलांनी घेतला आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182910797074202624?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182908437279072257?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

