Share

औरंगाबाद : कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांच्या नावावरून घोळ कायम

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. औरंगाबाद पश्चिम व पूर्व मतदारसंघातून पुरस्कृत उमेदवारांची नावे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी गुरुवारी (ता.10) जाहीर केली होती. मात्र ही नावे कॉंग्रेसच्या वेबसाईटवर आल्यानंतरच अंतिम होतील, असा दावा शहर उपाध्यक्ष ऍड. पवन डोंगरे यांनी शुक्रवारी (ता.12) केला. त्यामुळे उमेदवारही अचंबित झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत शहरात कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. आघाडीमध्ये औरंगाबाद शहर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी सोडण्यात आले होते; मात्र ऐनवेळी पूर्व मतदारसंघाची जागा आघाडीतील मित्रपक्ष समाजवादी पक्षाला सोडण्यात आली; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर समाजवादी पक्षासोबतची आघाडी तुटली. पश्चिम मतदारसंघातून कॉंग्रेसने दिलेले उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. यामुळे दोन्ही जागा हातातून गेल्या. आता कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातही वाद झाला.

त्यामुळे या दोन्ही जागांवर कॉंग्रेसने कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आला होता. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार गुरुवारी शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी पुरस्कृत उमेदवारीची नावे जाहीर केली; मात्र शुक्रवारी ऍड. डोंगरे यांनी एका पत्रकार परिषदेत पवार यांनी जाहीर केलेल्या नावांना दुजोरा दिला नाही. कॉंग्रेसच्या वेबसाईटवर नावे लवकरच जाहीर होतील, असे त्यांनी नमूद केल्यामुळे पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला शहर व जिल्हाध्यक्ष हजर नव्हते तर प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182988730765701122?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!