टीम महाराष्ट्र देशा :- औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे.या मतदार संघात महायुतीकडून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आणि महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे कदिर मौलाना आमने सामने होते. या लढाईत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर आहेत.
दरम्यान , राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएम च्या इम्तियाज जलील यांनी 61 हजार 843 एवढी मते घेत विजय मिळवला. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे प्रदीप जैस्वाल होते.
https://twitter.com/Maha_Desha/status/1187209906195091456?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187209801538793472?s=20


