औरंगाबाद: औरंगाबाद पूर्व पाचव्या फेरी दरम्यान एमआयएमचे गफ्फार कादरी हे 37 हजार मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीपासून कादरी हे आघाडी घेत आहे दरम्यान महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे हे पाचव्या फेरीपर्यंत तिसऱ्या स्थानी होते. अजून नऊ फेरीपर्यंत कादरी हे आघाडी घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यमंत्री साळवे यांना पहिल्या फेरीपासून पाचव्या फेरीपर्यंत केवळ 1 हजार 39 मध्ये मिळाली आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार कलिम कुरेशी यांना पाचव्या फेरीला 2 हजार 895 मते मिळाले. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीस पोस्ट मतमोजणी झाली त्यानंतर पोस्टल मतमोजणी व पहिल्या फेरीचा निकाल एकत्र जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीपासून राज्यमंत्री अतुल सावे हे पिछाडीवर आहे.
यात एकूण 34 उमेदवारांपैकी 23 उमेदवार अपक्ष होते. आणि 23 मुस्लिम उमेदवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होईन असे वाटले होते मात्र प्रत्यक्षात निकाल वेगळाच लागत आहे.
पहिल्या फेरीत कादरी यांना 7 हजार 996 तर अतुल सावे यांना 63, दुसऱ्या फेरीत 71 मते मिळाली. सुरुवातीच्या आठ ते नऊ फेऱ्या या मुस्लिम बाहुल पट्ट्यातील आहेत. त्यामुळे या फेऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाचे कलीम कुरेशी व अपक्ष युसूफ मुकाती त्यांना चांगली मतदान में असे वाटले होते मात्र सर्व मतदार हे एकटा एमआयएमच्या बाजूने गेल्याचे पाचव्या फेरीत पर्यंतचे चित्र आहे. सकाळी नऊ वाजता पहिली फेरी जाहीर झाली तर दहा साडेदहा वाजता दुसरी फेरी जाहीर झाली.
औरंगाबाद पूर्व
पाचवी फेरी
अतुल सावे -509
गफ्फार कादरी 7396
कुरेशी 1547
https://twitter.com/Maha_Desha/status/1187243077833854976?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187242941015711744?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

