Share

आशुतोष राणांनी अनोख्या पद्धतीने केल रेणुका शहाणे यांना प्रपोज; अशी आहे लव्हस्टोरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील खास जोडी म्हणून अभिनेत्री  रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांना ओळखले जाते. या दोघानी बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केल आहे. रेणुका यांना ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटाच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळाली. रेणुका सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्या विविध मुद्यांवर आपल परखड मत मांडत असतात. या गोष्टींमुळे त्या अनेक वेळा चर्चेत झाल्या आहेत.  आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे दोघंही कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून आजवर त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. मात्र आज २५ मे रोजी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटाच्या सेटवर रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट  झाली होती. गायिका राजेश्वरी सचदेव यांनी या दोघांची ओळख करुन दिली. त्यावेळी पहिल्याच भेटीत त्यांनी मी तुझा मोठा चाहता आहे असे रेणुका यांना सांगितले होते. या पहिल्या भेटीनंतर त्यांची लवकर भेट झाली नाही. त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडू लागले. एक कविता ऐकवत आशुतोष यांनी रेणुकाला प्रपोज केले होते.

https://www.instagram.com/p/CAmbgapgafy/?utm_source=ig_embed&ig_rid=315588bd-0bb7-4d6b-b4af-4013c9c8ea50

रेणुका यांच्या आई संभ्रमात होत्या. आशुतोष हे मध्य प्रदेशमधील एका लहानशा गावातून आले होते. त्यातच त्याचे कुटुंब प्रचंड मोठे होते. त्यांच्या परंपरा, रूढी या वेगळ्या होत्या. त्यामुळे रेणुका हे सगळं कसे मॅनेज करतील हा प्रश्न त्यांच्या आईला होता. परंतु, त्यानंतर रेणुका-आशुतोष यांनी आईची समजूत काढली आणि अडीच वर्षांनी त्यांनी लग्नगाठ बांधली. रेणुका शहाणे यांच्या लग्नाला आता जवळपास १९-२० वर्ष झाली आहेत. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं देखील आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!