Share

राजकारण नंतर करू ही वेळ ब्लेमगेमची नाही, अशोक चव्हाणांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या संकटात  राज्यकर्त्यांमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही वेळ ब्लेमगेम नसून एकत्र लढण्याची आहे. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आरोप-प्रत्यारोप करूच, असे अशोक चव्हाण म्हणाले.

एका मुलाखती दरम्यान अशोक चव्हाणांना विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तरले. ते म्हणाले की, मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, ही ब्लेमगेमची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. करोनाचं संकट संपल्यावर ते करू. विधानसभा निवडणुका लागल्यावर ते करू. त्यावेळी आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ. देशानं पाकिस्तानशी युद्ध केलं तेव्हा पूर्ण देश एकत्र होता. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला, तेव्हा देश एकत्र होता. हा सुद्धा एक लढा आहे आणि एकत्रितपणे लढला पाहिजे.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करोनासंदर्भात काम करताना मंत्रिमंडळांमधील नेत्यांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली होती.  यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आह. काहीही अनुभव नसताना व ठाकरे हे उत्तमरीत्या प्रशासन चालवत आहेत, असे चव्हाण म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!