🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुदखेड तालुक्यातील डोनगाव येथे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, जात आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप-शिवसेना सरकारने गेल्या 5 वर्षांत केला असल्याचा आरोप चव्हाण यांनी सरकारवर केला आहे.
तसेच पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गेल्या पाच वर्षात या सरकारला करता आले नाही. केवळ भावनेला हात घालून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम यांनी केले आहे. कोळी, धनगर, मुस्लीम या समाजासाठी सरकारने काय केले, असा आरोप केला.
दरम्यान, पुढे बोलताना चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले. याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, कर्जमाफी, मेगाभरती, पीकविमा याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही, असे यावेळी चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182555168824410112?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182552605412605953?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

